जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी ! Japan moon Mission | स्लिम , JAXA

जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी ! Japan moon Mission  | स्लिम , JAXA

जपानचं स्लिम मून मिशन यशस्वी झालं आहे. या चांद्रमोहिमेअंतर्गत जपानने त्यांचं अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं आहे. याद्वारे जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत.

Japan moon Mission  | स्लिम , JAXA
Japan moon Mission  | स्लिम , JAXA



 जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे.


जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत.


स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon).


 जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA आहे.


गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी जपानी अंतराळ संशोधन केंद्राचं हे अवकाशयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं. चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. २५ डिसेंबर रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाची लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर इतकी आहे. या यानाच्या लँडरचं वजन २०० किलो इतकं आहे. यामध्ये रडार, लेजर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टिम आहे.



लँडिंग साईट आहे ‘खास’

ज्या जागेवर हे यान उतरवण्यात आलं त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असं नाव देण्यात आलं आहे. हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्राचा पृष्ठभाग पाहिल्यास त्यावरील एक सर्वाद गडद काळा डाग म्हणजे ही लँडिंग साईट आहे. चंद्रावर असा आणखी एक डाग (गडद अंधार असलेला प्रदेश) आहे. मेयर नेक्टारिस असं त्या साईटचं नाव आहे. या जागेला चंद्राचा समुद्रदेखील म्हटलं जातं. जपाने अंतराळ संशोधन केंद्र आता शिओली क्रेटर प्रदेशात संशोधन करणार आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.