Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024
![]() |
| Nagar-Vikas-Vibhag-Maharashtra-Bharti-2024 |
अभ्यासक्रम व शैक्षणिक अर्हता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ जानेवारी रोजी द्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदाची भरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. असे असतानाही संबधित विभागाने आजपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.
महाराष्ट्र शासन ७५ हजार रिक्त पदांची भरती करत आहे. विविध विभागांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालयअंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदे रिक्त आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी ३७२० पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, असे जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केले होते. या विभागाद्वारे येणाऱ्या जाहिरातीचा अभ्यासक्रमही जून महिन्यात जाहीर केला होता; मात्र आजपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध झाली नसून लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी ही जाहिरात प्रसिद्ध करा, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे विकास धोत्रे यांनी दिली.

