शीर्षक नाही

 1. कच्छपी लागणे = एखादे काम करुन घेण्यासाठी समर्थाचा आश्रय करणे-पिच्छा पुरवणे.

 2. आकाशी सूत धरणे = मनुष्य जीवंत आहे की नाही हे पहाणे.

 3. भिकार चाळे = दरिद्रीपणाचे लक्षण / निरुपयोगी कृत्य 

4. सूर्याच्या पोटी शनीश्वर = चांगल्या बापाच्या पोटी वाईट मुलगा जन्मास येणे

. 5. आवळ्यायेवढे पूज्य = पूर्ण अभाव

 6. तेरा बारा चालणे = वाद चालणे/कलागत चालू असणे. 

7. कंठ फुटणे = आवाज काढता येऊ लागणे

. 8. कानाचा चावा घेणे = कानात सांगणे

 9. तोंडाची टकळी = जिभेचा पट्टा, अद्वातद्वा बोलणे. 

10.तळ हातास केस आले नाहीत = अजून काम करण्याची अंगात धमक आहे

. 11.नख लावणे = जीव घेणे.

 12.नाकांत काड्या घालणे = चीड येईल असे कृत्य करणे. 

13.नाकाचा बाल = अत्यंत प्रीतीतले माणूस 

 14.नाकावर माशी बसू न देणे = चिडीस जाणे 

 15.पाठी ना पोटी = पाठी (भाऊ) नाही व पोटी (मुलगा) नाही. 

 16.मनगटास केस येणे = हातातला जोर कमी/नाहीसा होणे. 

 17.मातीचे कुल्ले = ओढून ताणून बळच लावलेले नाते/ उसने प्रेम बारदायान संबंध 

 18.वाघाचा डोळा = रुपया 

 19.हातास हात लागणे = एखाद्यापासून दक्षिणा वगैरे द्रव्य मिळणे. 

 20.चुलीला अक्षत लागणे = चुल न पेटता राहणे 

 21.जानवे तोडवयास उठणे = अतिशय चिडणे 

 22.पाट लावणे = विधवेने पुनः लग्न करणे 

23.धोंडभट्टी करणे = खरोखर स्नान न करता स्नान केले असे दिसावे म्हणून भस्म, गंध वगैरे लावणे. 

 24.बांगड्या वाढवणे = बांगड्या फुटणे 

 25.बेलभंडार उचलणे = शपथ घेणे

26.सखीचा लाल = उत्तम आईचा उत्तम मुलगा 

 27.हायदोस घालणे = नाचणे / ओरडणे 

28.सांगून येणे = मुलगी करता का असे विचारणे. 

 29.चांदी उडणे = त्रेधा होणे

 30.नीळ नासणे = खोटी बातमी उठविणे. 

31.गमजे चालविणे = मर्यादा सोडून वर्तन करणे.

 32.बिब्बा घालणे = काम बिघडविणे

 33.शंख करणे = ओरड करणे / बोंब मारणे 

 34.खडे फोडणे = दूषणे देणे

 35.खप्पी मंडळी = लाजणारी मंडळी

 36.गम खाणे = उतावीळ न होणे / धीर धरणे 

 37.गाढवाचा खरारा = मुर्ख मनुष्य 

38.गाय गोवणे = मुलीला सुख लागणार नाही अशा ठिकाणी तिला देणे. 

 39.चंदन करणे = नाश करणे 

40.जाडे प्रकरण = असामान्य मनुष्य 

41.ट फ करणे = एखाद्या विषयाचे अल्पज्ञान होणे. 

 42.टाळूवर मिरे वाटणे = एखाद्यावर अधिकार गाजविणे

 43.दगडावरची रेष = न फिरणारे (न खोटे ठरणारे) शब्द

 44.दिवसा मशाल लावणे = व्यवसनाचे पायी पेंशाची उधळपट्टी करणे.

45.पणांत येणे = वयात येणे 

 46.पळते पीक = कोणत्याही व्यापरधंद्यातला शेवटचा नफा 

 47.पाण्याचा कांटा मोडणे = अग्निसंयोगाने ते किंचित उष्ण होणे. 

 48.पुख्खा झोडणे = स्वतःश्रम न करता, मिळालेल्या अन्नावर यथेच्छ हात मारणे.

 49.पुडीस जाणे = जेवणास जाणे 

 50.पेढे चारणे = फसवणे 

 51.पैठणी आदर-प्रेम-आग्रह = पोकळ आदर / वरकरणी केलेला आदर 

 52.बजबजपुरी करणे = घोटाळा / चुथडा करणे 

 53.बलबलपुरी होणे = गोंधळ

54.भंडार उधळणे = स्तुति करणे 

 55.मुली उजविणे = मुलींची लग्ने करणे 

 56.मोळी बुचकळणे = स्नान करणे 

 57.योगक्षेम चालविणे = संसाराची एकंदर व्यवस्थापाहणे 

58.हिंगाचा खडा = त्रास देणारा मनुष्य

 59.अचकट विचकट बोलणे = वेडेवाकडे बोलणे

 60.अस्मिता चेतावणे = स्वाभिमान दुखावणे 

 61.अंत्राळी पंत्राळी करणे = महत्वाच्या कामात वरवरच्या गोष्टी करणे 

 62.सोस करणे = अतिलोभ करणे. 

63.यजमान करणे = नवरा करणे 

 64.कानात मंत्र सांगणे = गुपीत सांगणे 

65.कढ काढून रडणे = जोरा-जोरात रडणे 

 66.कान कापून हातावर देणे = सराईत गुंड भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करतात व आपला मतलब काढून घेतात. 

 67.अंग धरणे = गुटगुटीत होणे 

68.अंग काढून घेणे = संबंध तोडणे 

69.अंग टाकणे = रोडावणे 

70.अंग मोडून येणे = अंगात कसकस येणे 

71.द्रोपदीची थाळी = नेहमी गरज भागवणारी व्यक्ती 

72.तोलास तोल देणे = बरोबरी करणे 

73.वर्दळ घालणे = भांडत बसणे 

 74.शरपंजरी पडणे = दुखण्यात खितपत पडणे 

75.पाणी फिरणे = फुकट जाणे 

 76.पाणी शिरणे = उतरती कळा लागणे 

77.पाणी घालणे = नाश करणे 

 78.पाणी जाळणे = क्रूरपणाचे कृत्य करणे. 

 79.काची पडणे = धास्ती धरणे 

80.फजिती करणे = रेवडी उडवणे 

81.जडभरत = आळशी माणूस 

82.हिंडिबा = धिप्पाड 

83.त्राटिका = जहांबा

84.घटोत्काचा बाजार = फसवागिरी 

 85.तारे तोडणे = वेड्यासारखे बोलणे 

 86.तोंड टाकणे = अद्वाद्वा बोलणे 

87.तोंडात बोट घालणे = नवल करणे 

 88.तोडावर येणे = फार जवळ येणे 

89.कोल्हेकुई करणे = व्यर्थ ओरड करणे 

90.अलबत्या गलबत्या = क्षुल्लक माणूस 

91.अर्धचंद्र देणे = गचांडी देणे 

92.कनीक तिंबणे = खूप मार देणे 

93.अर्ध्या वचनात असणे = एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे 

94.अव्वाच्या सव्वा = खूप जास्त वाढवून सांगणे 

95.षष्ठी करणे = झालेल्या चुकांबद्दल रागावणे 

96.औट घटकेचे राज्य = कमी काळ टिकणारे राज्य 

97. चतुर्भूज होणे = हळद लागणे 

 98. गळ्याशा येणे = अंगलट येणे 

99. मेतकूट जमणे = दाट मैत्री होणे 

100. पोटात घालणे = क्षमा करणे 

101. चुकी ठेवणे = दोष लावणे, नावे ठेवणे, कनिष्ठपणा देणे, वरचढपणा कमी करुन कमीपणा आणणे. 

 102. पोबारा करणे = सूंबाल्या करणे, धुम ठोकणे 

103. मूळावर येणे = नाशास कारणीभूत होणे 

 104. सुपारी देणे = करार करणे, सौदा करणे 

105. षटकर्णी होणे = गुप्त गोष्ठ तिसऱ्यास सांगणे. 

106. खो घालणे = अडथळा आणणे 

 107. मृत्यू पावले = कामी येणे 

 108. जोडे फाटणे = नाहक ये-जा करणे, खेटे घालणे 

109. झाकले माणिक = साधा पण गुणी मनुष्य 

110. हातावर तुरी देणे = डोळ्यादेखत फसवून निसटून जाणे. 

111. कंठात प्राण येणे = भयाने घाबरगुंडी उडणे 

112. काळजाला घरे पडणे = दुःख होणे 

 113. शंख पडणे = ओरडण.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.