होमगार्ड Bharti 2025
माहितीपत्रक :-
उद्देश:- देशातील जास्ती जास्त नागरीकांना सैनिकी, तसेच आपतकालीन मदतकार्याचे कायदा व सुव्यवस्था
सुरळित राखण्याचे प्रशिक्षण देवून जबाबदार व शिस्तप्रिय नागरीक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे.
१. होमगार्ड सदस्यत्व :-
महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून शासन संचलित पुर्णत: मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही.हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३ -३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुर्णनोंदणी कृत करता येते..
२. होमगार्डसदस्यांचे कर्तव्य :-
होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही . पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थिती मध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात.
३. होमगार्ड ना देय भत्ते :-
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु.१०८३/- कर्तव्य भत्ता व रु. २००/-
उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु. १००/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. १८० / - कवायत भत्ता दिला जातो.
४. शास्ती:-
होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता
विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या / कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७(१) अन्वये बडतर्फ किंवा रु. २५०/- इतका दंड / तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.
५. होमगार्ड नोदणी:-
होमगार्ड नोदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही . मिळणे करीता काणत्याही इतर मार्गाचा ( वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. या करीता कोणीही लाच/पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बृहन्मुंबई किंवा मा. समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांचेशी संपर्क साधावा.
६. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे:-
- १. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
- २. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीसदल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.
- ३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
- ४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार / पदके मिळविण्याची संधी.
- ५. स्वत:चा व्यवसाय / शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.
होमगार्ड नोंदणी नियम व अटी
१. होमगार्ड पात्रतेचे निकष :-
अ) शैक्षणिक पात्रता -
- कमीत कमी १०वी उत्तीर्ण (SSC)
ब) शारिरीक पात्रता
- कमीत कमी १०वी उत्तीर्ण (SSC)
-
१. वय-२० वर्षे पुर्णते ५० वर्षांच्या आत. (ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय २० वर्षे पुर्ण असणे
आवश्यक )
२. उंची - पुरुषांकरीता - १६२ से.मी. महिलांकरीता - १५० से. मी.
३. छाती - ( फक्त पुरुष उमेदवारां करीता ) ( न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी.)
क) आवश्यक कागदपत्र -
१. रहीवासी पुरावा - आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणा-या उमेदवारांचे कागदपत्र ग्राहय धरले जातील, बाहय जिल्हयातील कागदपत्र ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी)
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्म दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. (तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरीट लावतेवेळी ग्राहय धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)
५. खाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६ . भरतीनंतर ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी व वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सुचना
१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २७ / १२ / २०२४ सकाळी १०.०० वा. पासून ते दि .१० / ०१ / २०२५ रात्री ०९.०० वा. पर्यंत या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन (मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल.) अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्हयातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा निवड प्रक्रियेस येताना अर्जावर चिटकवावा. मराठी मधील नाव उमेदवारानी स्वत: पेनानी लिहावयाचे आहे . इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १०/०१/२०२५ वेळ रात्री ०९.०० वाजेपर्यत राहील सर्व अर्जांची
छाननी झाले नंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल. ५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ. क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वत: घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करीता बंधन कारक राहील.
६. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी पक्रिये दरम्यान किंवा प्रवासा दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
७. पात्र उमेदवारांची अंतिम निवड रिक्त असलेल्या जागां नुसार गुणवत्तेच्या आधारावर
करण्यात येईल. समान गुणप्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस
प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड
निश्चित करणेत येईल.
८. यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम / बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पुर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहतील.
९. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेत स्थळावर प्रसिध्द केली जाईल.
१०. पथक / पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. समादेशक यांनी ठेवले आहे.
राखून
११. अर्ज भरणे संदर्भात काही अडचण असल्यास बृहन्मुंबई होमगार्ड कार्यालय येथे ०२२-२२८४२४२३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
होमगार्ड नोंदणी नियम व अटी
होमगार्ड पात्रतेचे निकष
अ) शैक्षणिक पात्रता - कमीत कमी १०वी उत्तीर्ण (SSC)
ब) शारिरीक पात्रता -
१. वय - २० वर्षे पुर्णते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४रोजी )
२. उंची - पुरुषां करीता - १६२ से.मी. महिलां करीता - १५० से. मी.
३. छाती - (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) ( न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी.)
क) आवश्यक कागदपत्र -
१. रहीवासी पुरावा - आधारकार्ड, मतदान ओळखपत्र२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्डप्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५.खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
ऑनलाईन अर्ज खालील प्रमाणे भरावा
होमगार्ड विभागाच्या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेत
स्थळावर जावुन HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सब मेनू निवडावा.
१. सर्व प्रथम जिल्हा Select करावा . ( ज्या जिल्हयात नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे मेनू मध्ये उपलब्ध असतील.)
२. आपला १२ अंकी आधार क्र. काळजी पुर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरविला जाईल.
३. यानंतर लिंग, पुर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, इमेल आयडी, ही माहीती काळजी पुर्वक भरावी.
४. वरील जाहीरातीमध्ये दिल्या प्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहेत त्यांची संख्या Select करावी. (उदा. उमेदवार जड वाहन परवानाधारक, प्राविण्य प्राप्त खेळाडू आणि NCC B प्रमाणपत्र धारक असेल तर तांत्रिक अर्हता संख्या तीन (Three) राहील)
५. जन्म दिनांक, उंची ( से. मी. मध्ये ) काळजी पुर्वक भरावी.
६. यापुर्वी होमगार्ड सेवेत असाल तर YES असे निवडावे. असाल तर ज्या कारणास्तव कमी करणेत आले त्या आदेशाची प्रत सोबत जोडावी.
७. अर्ज SUBMIT केल्यावर आपण सरळ PRINT करण्यासाठीच्या Page वर जाल त्या ठिकाणी आपला आधार क्र.आणि जन्म दिनांक भरुन आपल्या अर्जाची पहाणी करुन अर्जाची PRINT A४ पेपरवर काढावी व नोंदणी करीता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत सर्वर कनेक्टीवीटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि.२७/१२/२०२४ ते दि.१०/०१/२०२५ रात्री ०९.०० वाजेपर्यंत असा राहील.
संदीप जाधव समादेशक
होमगार्ड बृहन्मुंबई तथा
पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
२. शारिरीक क्षमता चाचणी-
*उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात उत्तिर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.
अ) धावणे
- पुरुष उमेदवार
- महीला उमेदवार
- १६०० मी. धावणे
- ५ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी
- २० गुण २० गुण
- ८०० मी. धावणे
- २५ गुण
- २ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी
- २५ गुण
- ५ मि.१० सेकंदापेक्षा जास्त परंतु
- १८ गुण
- २मि.५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. ००
- २२ गुण
- ५ मि. ३० सेकंदापेक्षाकमी
- सेकंदापेक्षा कमी
- ५ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु
- १६ गुण
- ३मि. ०० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. १०
- १८ गुण
- ५मि.५० सेकंदापेक्षाकमी
- सेकंदापेक्षा कमी
- ५मि.५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. १०
- १४ गुण
- ३मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. २०
- १४ गुण
- सेकंदापेक्षा कमी
- सेकंदापेक्षा कमी
- ६मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. ३० सेकंदापेक्षा कमी
- १२ गुण
- ३मि.२० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. ३०
- १० गुण
- सेकंदापेक्षा कमी
- ६मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६मि. ५० सेकंदापेक्षा कमी
- १० गुण
- ३मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. ४०
- ०६ गुण
- सेकंदापेक्षा कमी
- ६मि.५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ७मि. १० सेकंदापेक्षा कमी
- ०६ गुण ३मि.४० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३मि. ५०
- ०४ गुण
- सेकंदापेक्षा कमी
- ७मि.१० सेकंदा पेक्षा जास्त परंतु
- ०२ गुण
- ३मि.५० सेकंदापेक्षा जास्त परंतु
- ०२ गुण
- ७ मि. ३० सेकंदा पेक्षाकमी
- ७ मि. ३० सेकंदा पेक्षा जास्त
- ४ मि. पेक्षा कमी
- ० गुण
- ४ मि.०० सेकंदा पेक्षा जास्त
- ० गुण
• सुचना- धावणे चाचणीमध्ये पात्र होणेकरीता किमाण १० गुण मिळविणे आवश्यक राहील.
ब. गोळाफेक -
पुरुष उमेदवारांकरीता .
- गोळाफेकीचे अंतर अंतर मीटर मध्ये
- ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त ७.९० मीटर किंवा जास्त १० गुण
- ८.५० मीटर पेक्षाकमी ०९ गुण
- ७.३० मीटर किंवा जास्त ७.९० मीटर पेक्षाकमी ०८ गुण
- ६.७० मीटर किंवा जास्त ७.३० मीटर पेक्षाकमी ०७ गुण
- ६. १० मीटर किंवा जास्त ६.७० मीटर पेक्षाकमी ०६ गुण
- ५.५० मीटर किंवा जास्त ६.१० मीटरपेक्षाकमी ०५ गुण
- ४.९० मीटर किंवा जास्त ५.५० मीटर पेक्षाकमी ०४ गुण
- ४.३० मीटर किंवा जास्त ४.९० मीटर पेक्षाकमी ०३ गुण
- ३.७० मीटर किंवा जास्त ४.३० मीटर पेक्षाकमी ०२ गुण
- ३. १० मीटर किंवा जास्त ३.७० मीटर पेक्षाकमी ०१ गुण
- ३. १० मीटर पेक्षाकमी ०० गुण
क. गोळाफेक - महिला उमेदवारांकरीता
गोळाफेकीचे अंतर अंतर मीटर मध्ये
- ६.०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त १० गुण
- ५.५० मीटर किंवा जास्त ६.०० मीटर पेक्षाकमी ०८ गुण
- ५.०० मीटर किंवा जास्त ५.५० मीटर पेक्षाकमी ०६ गुण
- ४.५० मीटर किंवा जास्त ५.०० मीटर पेक्षाकमी ०४ गुण
- ४.०० मीटर किंवा जास्त ४.५० मीटर पेक्षाकमी ०२ गुण
- ४.०० मीटर किंवा जास्त ०० गुण
सुचना-
i) उमेदवाराला जास्ती जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधित्तम अंतर ग्राहय धरले जाईल. ii) गोळा जर सिमांकन रेषेच्या मध्यावर पडलातर उमेदवारांस नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. • गोळाफेक मध्ये पात्र होणे करीता उमेदवारांना किमाण ४ गुण मिळविणे आवश्यक राहील.
ड. तांत्रिक अहर्तागुण-
तांत्रिक अहर्ता- एकुणगुण १०
१. आय टी आय (ITI) प्रमाणपत्र धारक
अटींची पुर्तताकेल्यास
गुण
२. खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या व्यक्ती.
( जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त)
- यापैकी१ अट पुर्णकरीत असतीलतर यापैकी २ अट पुर्णकरीत असतीलतर यापैकी ३ अट पुर्णकरीत असतीलतर यापैकी ४ अट पुर्णकरीत असतीलतर यापैकी ५ अट पुर्णकरीत असतीलतर
- २ गुण
- ३गुण
- ४गुण
- ५ गुण
- ७गुण
५. एन. सी. सी. सी प्रमाणपत्र
यापैकी ६ अट पुर्णकरीत असतीलतर
८गुण
१० गुण
३. माजीसैनिक (डिस्जार्जकार्ड आवश्यक)
४. एन. सी. सी. बी प्रमाणपत्र
६. नागरीसंरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणीतीन सर्व अटी पुर्णकरीत असतीलतर
प्रशिक्षण पुर्णकेलेले प्रमाणपत्र धारक
७. जड वाहनचालक परवाना धारक
(तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरीट लावतेवेळी ग्राहय धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राहय धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)





